धाराशिव (प्रतिनिधी)- एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत धाराशिव तालुक्यातील वरवंटी, गावसूद, पोहनेर, बेगडा, सुर्डी, चिलवडी या गावामध्ये शेततळे, फळबागा योजना आदिची कामे या योजनेंतर्गत चालू आहेत. शेतकर्यांनी पदर मोड करत सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता कामे करुन घेवुन देखील प्रशासकिय यंत्रणेमुळे शेतकर्यांची आर्थिक ओढाताण सुरु होती. त्यानुषंगाने संबंधित शेतकर्यांनी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना या कामात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानंतर खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रकल्प कार्याविण यंत्रणा तालुका कृषी अधिकारी तसेच एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाचे जिल्हा सचिव, जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्याशी चर्चा करुन तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दि. 13/06/2023 रोजी 50 लक्ष रु निधी हस्तांतरित केला आहे. त्यामुळे शेतकर्यांची आडकलेली सर्व रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उपरोक्त गावातील लाभार्थ्यांकडून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.