मुरूम (प्रतिनिधी)-  भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोदी ऽ9 महा-जनसंपर्क अभियान उमरगा-लोहारा तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी मुरूम शहरातील श्रीराम मंगल कार्यालयात महा-जनसंपर्क अभियानांतर्गत लाभार्थी संमेलन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थिती सोमवारी (ता.26) रोजी पार पडले. यावेळी बोलताना मिश्रा यांनी भाजप सरकारच्या 9 वर्षाच्या काळातील झालेल्या कामाबाबतची माहिती दिली. गेल्या 70 वर्षांपासून विकासापासून वंचीत असणार्‍या देशाला  2014 सालापासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने अनेक विकासाची कामे करण्याची संकल्पना आखली. त्या संकल्पना गेल्या 9 वर्षात पूर्णत्वाकडे घेऊन जात आहेत. अनेक पक्ष येतात विविध आश्वासने देतात मात्र जनसामान्यांचे विकासात्मक कामे तसीच प्रलंबित राहतात, भाजप हा एकमेव पक्ष असा आहे. 

ज्यांनी आश्वासने दिली आणि त्या आश्वसनाप्रमाणे कामे केल्याची महा-जनसंपर्क अभियानातून नागरिकांना संपर्क साधून आपल्या कामाचा आढावा आम्ही जनतेसमोर मांडत आहोत. यावेळी आ. राणा जगजितसिंह पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य संताजी चालुक्य, जिल्हा उपाध्यक्ष अभय चालुक्य, संयोजक राहुल पाटील, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, भाजपचे नेते सुनिल माने, लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, उमरगा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, तालुका संयोजक श्रीकांत मिणियार, चंद्रशेखर मुदकण्णा, गुलाब डोंगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना मिश्रा म्हणाले की, राज्यात 2019 मध्ये जनतेने भाजपा सरकारला निवडून दिले होते, मात्र शिवसेनेने त्यांच्याशी गद्दारी केल्याने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. अशा पाठीत खंजिर खुपसणार्‍यांना गाडून परत एकदा राज्यात आणि केंद्रात भाजपा सरकारला स्पष्ट बहुमताने विजयी करून नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे आव्हान करीत मोदी ऽ9 म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षाच्या कारकीर्दीची माहिती दिली. 

यावेळी राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बंजारा समाज महिला भगिनीच्या वतीने केंद्रीयमंत्री मिश्रा यांचा सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या दरम्यान अंबरनगरचे माजी सरपंच गोपाळ चव्हाण यांनी आपल्या समर्थकांसह तसेच उमरगा-लोहारा तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. इक्बाल मुल्ला, शिवशंकर हत्तरगे, प्रसाद मुदकण्णा, विरेश गुंडगोळे, शरणप्पा मुळे, सिध्दू हिरेमठ, सुनिल निलवाडे, जाकीर जमादार, व्यंकट चौधरी, सागर पाटील, बबलू महाबुसे, आकाश क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत मिणीयार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय जाधव तर आभार चंद्रशेखर मुदकण्णा यांनी मानले. उमरगा-तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

 
Top