तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूरच्या लगत  मौजे. तडवळा गाव  येथील  शेतजमिनी  रेल्वेने  अधिगृहण

केलेल्या आहेत दोन हजार कोटीचा तुळजापूर विकास आराखडा राबवला जात असल्याने या जमिनीना सोन्याचा भाव आल्याने तडवळा येथील शेत जमीनीला तुळजापूर विकास आराखडा पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना समाधानकारक योग्य मोबदला देण्याची मागणी बाधीत शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी, खासदार, आमदार यांना निवेदन देवुन केली आहे. 

तिर्थक्षेञ तुळजापूर हद्द संपताच अवघा पाच फुटावर मौजे. तडवळा हद्द लागते. या परिसरातुन गावातून सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी सर्वे झाला असून त्यामध्ये आमच्या शेत जमिनी  जाणार आहेत. त्याबाबत जाहीर प्रगटन आमचे गावातील ग्रामपंचायत कार्यालयात लावलेले आहे. सदर सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणा वेळीस संबंधीत मोजणी अधिकारी यांनी चुकीच्या पध्दतीने नोटीस देवून अनेक शेतकर्‍यांची चुकीच्या पध्दतीने मोजणी केलेली आहे. सदर मोजणीस ठरावीक लोक हजर होते इतर लोकांच्या शेतामध्ये असलेल्या फळ झाडांची, बोअरवेल, विहिर, पाईपलाईन, घरजागा, पत्र्याचा गोठा, इ. असताना सुध्दा त्याच्या नोंदी घेतलेल्या नाहीत. त्याबाबत संबंधीत अधिका-यांना अर्ज दिला असता सदर अर्ज घेतले नाहीत. या निवेदनावर 

वैजनाथ बेले, दादा कोळेकर, लखन गुंड,  श्रीमंत गुंड, अरविंद चंदनशिवे, वाघमारे, शेख, प्रविण कदम, पद्मजा कदम,  बापु गुंड सह बाधीत शेतकर्‍यांच्या स्वाक्षरी आहेत.


 
Top