धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी आपले जीवन यशस्वी करण्यासाठी विशिष्ट ध्येय समोर ठेवून पाचवी पासून त्यांचे नियोजन करावे. पालकांनी आपल्या मुलांचा कल पाहून त्यास प्रोत्साहन द्यावे असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
कै. रूपाबाई विश्वनाथ गुंड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त धाराशिव तालु्नयातील पाडोळी येथे यशवंत व गुणवतं विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या पालकांसह करण्यात आला. त्याप्रसंगी सीईओ गुप्ता बोलत होते. यावेळी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. श्री व्यंकटराव गुंड, डॉ.दिग्गज दापके, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, हभप. अॅड. पांडुरंग लोमटे, हभप. बाबुराव पुजारी, दादा शिराळ आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना गुप्ता यांनी शाळेच्या यशस्वी वाटचालीबद्दल अध्यक्ष, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी गुप्ता यांनी स्पर्धा परिक्षा व इतर परिक्षेत पास होण्यासाठी काही टिप्पस दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य मनसुळे यांनी केले. सुत्रसंचालन बापू शेख सर यांनी केले. यावेळी रामदास गुंड, बबन सुरवसे, अॅड. अजित गुंड, अॅड. शरद गुंड, मुख्याध्यापक सुर्यवंशी शिक्षक वर्ग गोरे, सुर्यवंशी, यादव, अमोल गुंड, प्रदिप सुर्यवंशी, पवार, जावळे, सोनकठले, राख, गावित, श्रीमती गुंड मॅडम, श्रीमती माळी मॅडम, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.