धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील काळा निंबाळा येथील भूमिहीन शेतमजूर या कुटुंबातील श्रीरंग सरवदे यांची फकीरा ब्रिगेड संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रातून सरवदे यांना विविध माध्यमातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपरात आन्याय, अत्याचारग्रस्त गोरगरिबांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणार्‍या श्रीरंग सरवदे  यांची केंद्रीय प्रदेशाध्यक्षपदी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली्.

यावेळी राज्य उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र लोदगेकर, मराठवाडा उपाध्यक्ष संजय वेरुळे, लातूर जिल्हा अध्यक्ष सचिन शिंदे, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण खंडाळे, महिला गाडी जिल्हाध्यक्ष नागिनी थोरात, सुरेखा गायकवाड, नागपूर तालुका अध्यक्ष शरद धबडगे, वैशाली पवार, नितीन शिंदे, अभंग मगर, मनिषा सचिन शिंदे यांची उपस्थिती होती.


 
Top