उमरगा (प्रतिनिधी)-भारत देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने कणखर नेतृत्व लाभले. विकास कामांबाबत केलेला संकल्प आपल्या  वर्षाच्या कालखंडात पूर्णत्वाकडे घेऊन गेला. भाजप हा एकमेव पक्ष असा आहे ज्यांनी आश्वासने दिली आणि त्या आश्वसनाप्रमाणे कामे केली. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार प्रयत्नशील असून मोदी सरकारने केलेल्या  वर्षातील कामांची माहिती संपर्क अभियानाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी केले.

भारतीय जनता पार्टीच्या मोदी @9 या कार्यक्रमाअंतर्गत उमरगा व लोहारा तालुक्यातील लाभार्थ्यांच्या मेळावा मुरुम येथे  आयोजित लाभार्थी संमेलनात ते बोलत होते. या मेळाव्याला आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राज्य कार्यकारीणी सदस्य संताजी चालुक्य, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अभयराजे चालुक्य, माधव पवार, तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.  पुढे बोलताना मिश्रा म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर 65 वर्षे विकासापासून वंचीत असणार्‍या देशाला  2014 साली नरेंद्र मोदी यांच्या रूपाने कणखर नेतृत्व लाभले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास कामांबाबत केलेला संकल्प आपल्या  वर्षाच्या कालखंडात पूर्णत्वाकडे घेऊन गेले. अनेक पक्ष सत्तेत येतात विविध आश्वासने देतात मात्र जनसामान्यांचे विकासात्मक कामे तसेच प्रलंबित राहतात. भाजप हा एकमेव पक्ष असा आहे ज्यांनी आश्वासने दिली आणि त्या आश्वसनाप्रमाणे कामे केली. नागरिकांशी संपर्क साधून केलेल्या कामाचा आढावा मांडण्यासाठी देशभर मोदी @9 महा जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्रीकांत मिणीयार, अनिल बिराजदार, चंद्रशेखर मुदकण्णा, गुलाब डोंगरे आदीसह केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळालेले लाभार्थी, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्ता जाधव यांनी, श्रीकांत मिनियार यांनी प्रास्ताविक तर चंद्रशेखर मूदकण्णा यांनी आभार मानले.


 
Top