उमरगा (प्रतिनिधी)-शासनमान्य महाराष्ट्र टॅलेंट सर्च एम टी एस परीक्षा जळगाव यांच्या वतीने दि. 05 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय  परीक्षेत उमरगा येथील ओरियन इंग्लीश मेडीयम स्कूल मध्ये चौथ्या वर्गात शिकत असलेली कु. प्रांजल रामभाऊ गायकवाड, हिने 200 पैकी 184 गुण मिळवून राज्यातुन तिसरा क्रमांक पटकावला आहे. 

या यशाबद्दल जळगाव येथे दि.  25 जुन 2023 रोजी क.ब.चौ.उतर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के.बी.आण्णा पाटील  व विद्यमान कुलगुरू मा. माहेस्वरी,  शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक निळकंठ गायकवाड, यांच्या हस्ते कु.प्रांजल गायकवाड व त्यांच्या पालकांचा सुवर्ण रजत व कांस्य पदक, सर्टिफिकेट व ट्रॅाफी तसेच शिष्यवृत्तीचा धनादेश वरील  मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून सत्कार व कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. याप्रसंगी लेखक,प्रेरक,वक्ता, प्रशिक्षक, .मनोज गोविदवार व जिल्हाध्यक्ष व बालविकास कल्याण विभाग देवयानी गोविदवार यांची  प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन परीक्षा मंडळाचे संचालक योगेश राणे यांनी केले होते. प्रस्ताविक सुभाष महाजन यांनी केले. तर आभार आडावदकर मॅडम यांनी मानले.


 
Top