धाराशिव (प्रतिनिधी)-शेतकर्यांना येणार्या विविध अडचणी जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्या समस्येची निराकरण व्हावे या उद्देशाने कृषी महाविद्यालय आळणी येथील शास्त्रज्ञांच्या चमूने उस्मानाबाद तालुक्यातील विविध शेतकर्यांना त्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांना येणार्या अडचणी व त्यातून उत्पन्न होणारे नैराश्य व आत्महत्या यांची कारणीमिमांसा शोधून प्रभावी कृषी धोरण तयार करण्याच्या उद्देशाने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांनी आयोजित केला होता.
याचाच एक भाग म्हणून कृषी महाविद्यालय,आळणी येथील शास्त्रज्ञांच्या चमूने उस्मानाबाद तालुक्यातील खेड, आळणी व उपळा येथील शेतकर्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन,तूर, सिताफळ, हरभरा, ऊस इत्यादी पिकांवरील कृषी विषयक अडचणी जाणून घेऊन त्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले तसेच हवामान बदलांचा पिकांवर होणारा परिणाम यासंदर्भात देखील शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याव्यतिरिक्त कृषी विभागातील राबवलेल्या योजनांचा या उपक्रमातून आढावा घेण्यात आला.
हा उपक्रम कृषी महाविद्यालय, आळणी चे प्राचार्य डॉ. के. एच. पाटील व व्यवस्थापक प्रा.घाडगे एच. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या उपक्रमात शास्त्रज्ञ डॉ. ए. ए. गांधले, प्रा. शेटे डी. एस., प्रा. सुतार एन. एस., प्रा. गार्डी ए. जी., प्रा. पाटील एस. एन., प्रा. भालेकर एस. व्ही., प्रा. खरपुडे पी. सी., प्रा. वाकळे ए.जी., दळवे एस. ए., प्राध्यापक खोसे पी. जे., प्रा. साबळे एस. एन., प्रा. थोरे एस.जे., प्रा. खडके एस. ए. प्रा. सोन्ने ए. एस., प्रा. नागरगोजे व्ही.टी., साठे एम. पी. यांचा समावेश होता.