धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव-आळणी गडपाटी येथील अध्यापक महाविद्यालयात कार्यरत असणार्‍या प्रा.सुकेशनी सतीश मातने यांनी मार्च  मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत समाजशास्त्र विषयातून यश मिळवले आहे.त्या यापूर्वीच शिक्षणशास्त्र या विषयातून सेट व नेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.

प्रा.सुकेशनी मातने या गेल्या सोळा वर्षापासून अध्यापक विद्यालय व महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करत असून त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेमिनार मध्ये देखील सहभाग घेतला आहे. त्यांच्या या यशाबद्दल  माजी कुलगुरू डॉ.वेदप्रकाश पाटील,धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील,डॉ.कैलास मोटे समाजातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

 
Top