धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे झालेल्या जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या आढावा बैठकी दरम्यान महाराष्ट्र प्रदेश सेवादलाचे उपाध्यक्ष अग्रवाल  यांच्या हस्ते सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळू यांनी संजय पवार यांना कळंब तालुका सेवादलाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती केली.

तसेच धाराशिव-कळंब विधानसभा समन्वयक म्हणून भारत गरड व कळंब शहर कॉंग्रेस सेवादल अध्यक्ष म्हणून सुनील गाडे यांची निवड करण्यात आली. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, कॉंगेस जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ शेरखाने, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, डी. सी. सी. बँकेचे संचालक महेबुब पटेल, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, धाराशिव शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, बाबुराव तवले, महिला कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ज्योती सपाटे, तालुकाध्यक्ष अंजली ढवळे, कळंब कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शहाजन शिकलगार, अनंत घोगरे, अभिजित गुजर, सुरेश मस्के यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.


 
Top