तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील प्रा. सचिन कल्याण पवार यांनी मार्च 2023 मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत भुगोल विषयातून सेट परिक्षेत यश
मिळवले आहे.
त्यांचे दहावी पर्यतचे शिक्षण आपले घर नळदुर्ग येथे झाले असुन दहावी बारावी परंडा येथे झाली आहे तर बी.ए.एम.ए. बार्शी येथे झाले आहे. विषयातून सेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. सचिन कल्याण पवार हे पारधी समाजातील असुन भुगोल विषयात सेट परिक्षा पास होणारे पारधी समाजातील एकमेव आहेत. सचिन पवार यांचे वडील कल्याण पवार हे तुळजापूर येथील पोलिस स्टेशनमध्ये पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. सचिन पवार यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वञ अभिनंदन होत आहे.