तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काक्रंबा ते हंगरगा तुळ रस्त्यावर असणार्या पुलाची प्रचंड दुरावस्था झाली असून, वाहन जाण्यासाठी केलेल्या पुलावरुन सध्या बैलगाडी ही जात नसल्याने या पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी काक्रंबा व हंगरगा तुळ येथील ग्रामस्थां मधून केली जात आहे
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा ते हंगरगा तुळ गावास जोडणारा रस्ता मागील वीस वर्षापासुन केल्याचे या भागातील ग्रामस्थांना आठवत नसल्याचे सांगत आहेत. सध्या या रस्ता असणारा पूल प्रचंड खराब झाला आहे. रस्त्यावर टाकलेले सिमेंट पाईप फुटले आहेत. एखादा पाऊस पडला तर हा रस्ता वाहुन जावुन फक्त फुटलेल्या सिमेंट नळ्याच जागेवर राहण्याची शक्यता आहे. सध्या या मार्गावरुन जाणार्या शेतकर्यांना शेतात जाणे कठीण बनले आहे. पाऊस पडला तर माञ शेतकर्यांना शेती कसणे कठीण होणार आहे. काक्रंबा व हंगरगा गावांस जोडणार्या या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी किंवा नव्याने बनवण्यास आरंभ करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी काक्रंबा ग्रामपंचायत ने उपअभियंता बांधकाम विभाग यांच्या सुचनेनुसार रस्ता परिस्थितीचा दुरावस्थेचा पंचनामा करुन कार्यालयास पाठवला असल्याने हा रस्ता तात्काळ करुन ग्रामस्थ व शेतकर्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.