धाराशिव (प्रतिनिधी)- रूपामाता उद्योग समुहाचे सर्वेसर्वा अॅड.व्यंकटराव गुंड आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकरराव गुंड गुरुजी यांच्या मातोश्री स्व.रुपाबाई विश्वनाथ गुंड यांच्या 20 व्या पुण्यतिथीनिमित्त पाडोळी (आ.) येथे विविध सामाजिक  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पाडोळी येथील रुपामाता नॅचरल शुगर युनिट क्रमांक 1 मध्ये चौथ्या गळीत हंगामाचा रोलर पूजन करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिशा, सह्याद्री ग्रूप ऑफ इन्स्टिट्युटचे अध्यक्ष डॉ. दिग्गज दापके देशमुख उपस्थित होते. रूपामाता उद्योगसमूहाचे अध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड, जि.प. माजी उपाध्यक्ष सुधाकरराव गुंड, अॅड.पांडुरंग महाराज लोमटे, बाबुराव पुजारी, जनरल मॅनेजर चंद्रकांत गरड, संचालक अॅड.अजित गुंड, सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ.दापके यांनी रुपामाता मिल्कला सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

रूपमाता अर्बन, रूपामाता मल्टीस्टेट यांच्या सर्व शाखांमधून, रुपामता पॉवर लि. माजलगाव, रूपामाता प्राथमिक विद्यालय, सांजा रोड धाराशिव येथेही पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आला. पाडोळी येथील श्रीराम मंदिरात पुण्यतिथीनिमित्त हभप  अॅड.पांडुरंग लोमटे यांचे कीर्तन झाले. यावेळी सुधाकर गुंड, हरिदास गुंड, शाहुराज गुंड, व्यंकट गुंड याच्यासह गुंड कुटुंबीय, ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top