तुळजापूर (प्रतिनिधी)- पंचाहत्तर वर्षा पुर्वीची जल व उर्जा निती बदलली पाहिजे, ती न बदलल्यामुळे देशात शेतकर्यांना आत्महत्या कराव्या लागतात हे अत्यंत दुर्देवाची बाब आहे असे मत तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा बीआरएसचे अध्यक्ष के. सी. चंद्रशेखरराव यांनी पत्रकारांशी बोलताना व्य्नत केले.
के. सी. चंद्रशेखरराव मंगळवार दि. 27 जूनच्या सांयकाळी तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांच्या समवेत मंत्री मंडळातील त्यांचे सहकारी उपस्थित होते. देवीला आपण काय साकडे घातले या संदर्भात बोलताना नेत्यांना कायम जनकल्याणाचे काम करण्याची सदबुध्दी दे असे साकडे घातल्याचे सांगितले. देशात पहिल्यांदाच आपण आपकी बार किसान सरकार हा नारा दिल्याचे सांगून के. सी. चंद्रशेखरराव यांनी बीआरएस पक्षाला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याबाबत इतर पक्षाने ओरडण्याचे कारण नाही असेही सांगितले. यावेळी माणिकराव कदम, अर्चना अंबुरे, रामजीवन बोंदर, देवानंद रोचकरी आदी उपस्थित होते. यावेळी मंदिर संस्थानच्यावतीने एसडीओ योगेश खरमाटे यांनी त्यांचा सत्कार केला.