तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथील सुल्तान काझी विचार मंचच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन पाठीवर कौतुकाची थाप दिली.
धाराशिव तालु्नयातील तेर येथील सुल्तान काझी विचार मंचच्या वतीने गावातील इयत्ता दहावी व बारावी मध्ये अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे जिल्हा परिषद उर्दु शाळा येथे अप्पासाहेब चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी सदस्य बाबुराव नाईकवाडी, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य बबलू मोमीन, सोसायटीचे माजी चेअरमन रियाज कबीर, मसूद काझी, माजी सरपंच महादेव खटावकर, मसूद काझी, बापू नाईकवाडी, अविनाश आगाशे, नामदेव कांबळे, माजीद काझी, अमोल थोडसरे, किशोर काळे, विजय चौगुले, लखन रसाळ, सुभाष कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन करुन अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या प्राची काळे, सना पठाण, संचिता चौगुले, तनिम काझी, मोमीन अलिशा, विवेक धुमाळ , शेख जुलेखा, प्रांजली ढोबळे, स्नेहा लांडगे, निकीता माने, ज्योती कोळेकर, आदि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचाचे अध्यक्ष फैसल काझी, उपाध्यक्ष मुक्तार काझी, सचिव खालेत काझी, सहसचिव झिया काझी, हसन शेख, अजहर महसूलदार, तनवीर बागवान, सलमान शेख, पप्पू काळे, विजय चौगुले, फयजल काझी आदि उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमाांचे सूत्रसंचालन क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे तर आभार प्रदर्शन जिया काझी यांनी मानले.