धाराशिव (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दि. 16 जून रोजी सकाळी 10 वाजता तुळजापूर तालु्नयातील पांगरदरवाडी येथील कृष्णा खोरे सिंचन प्रकल्पाच्या कामाची पाहणी करणार असून, यावेळी ते शेतकर्‍यांशीही संवाद साधणार आहेत. दरम्यान, त्यांच्याकडून धाराशिव आयटीआय येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या जागेचेही पाहणी करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. दरम्यान फडणवीस यांचा गुरूवारी होणारा दौरा शुक्रवारी दि. 16 जून रोजी होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाराशिव जिल्हा दौर्‍याच्या पार्श्वभुमीवर आमदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. मिलींद पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड. व्यंकट गुंड, अॅड, खंडेराव चौरे, अनिल काळे, सुधीर पाटील, नेताजी पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी ऽ 9 च्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यामुळे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. 

याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री फडणवीस जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. सुरूवातीला ते तुळजापूर तालु्नयातील पांगरदरवाडी येथील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामाची ते पाहणी करतील. येथील शेतकर्‍यांसोबतही ते संवाद साधणार आहेत. तसेच तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन विकास आराखड्यासंदर्भात त्यांच्यासमोर सादरीकरण होणार आहे. यानंतर ते शासकीय आयटीआय येथे पाच वाजेच्या दरम्यान येथील तेथे उपमुख्यमंत्री फडणवीस वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी करतील. नंतर मुंबईला त्यांच्याच अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल. तेथे जागा निश्चित होण्याची श्नयता आहेे. दरम्यान, 5.30 वाजता फडणवीस जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या शिवाय त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र व गोवा कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. पाटील यांच्या निवासस्थानी प्रबुध्द नागरी संवादाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगावकर यांच्या निवास्थानीही ते भेट देणार ओहत. अशीही माहिती आमदार पाटील यांनी दिली.


 
Top