धाराशिव (प्रतिनिधी) - स्कूल शिक्षा साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या वतीने राबविण्यात येणार्या जी 20- पुणे येथे होणार्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील आशिया खंडातील सर्व देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेसाठी श्रीपतराव भोसले हायस्कूलचे प्राचार्य-देशमुख एस.एस यांची उस्मानाबाद जिल्ह्यातून एकमेव निवड
झाली आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये निपुण भारत अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानात उस्मानाबाद जिल्ह्यातील उत्कृष्ट योगदानाबद्दल श्रीपतराव भोसले हायस्कूलचे प्राचार्य देशमुख एस.एस यांचा उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला होता तसेच श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन स्कूल शिक्षा साक्षरता विभाग,शिक्षा मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या वतीने राबविण्यात येणार्या जी 20 पुणे येथे होणार्या परिषदेसाठी श्रीपतराव भोसले हायस्कूलचे प्राचार्य देशमुख एस.एस यांची उस्मानाबाद जिल्ह्यातून एकमेव निवड झाली.या परिषदेस आंतरराष्ट्रीय आशिया खंडातील सर्व देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या शुभहस्ते देशमुख एस.एस यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी संस्थेच्या सरचिटणीस सौ प्रेमाताई सुधीर पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील तसेच सर्व इयत्तांचे पर्यवेक्षक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.