धाराशिव (प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव-मोदी ऽ9 कार्यक्रमाला येणार असून त्यांच्या दौर्याची सुरुवात तामलवाडी येथून होणार आहे, अशी माहिती राणाजगजितसिंहद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अजित गोपचे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अॅड. मिलिंद पाटील अॅड. अनिल काळे अॅड.खंडेराव चौरे, अॅड. व्यंकटराव गुंड उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस 15 जून रोजी सकाळी सोलापुरात येणार असून तेथून ते तामलवाडी मार्गे जिल्ह्यात येणार आहेत. त्यानंतर ते पांगरदारवाडी येथील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधतील. तेथून ते तुळजापूर येथे श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येतील तेथे मंदिर संस्थेच्या कार्यालयात विकास आराखडा सादर केला जाईल. त्यानंतर ते धाराशिव येथे येऊन वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करतील. त्यानंतर अॅड. मिलिंद पाटील यांच्या निवासस्थानी आणि स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगावकर यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेणार असून सायंकाळी 5.30 नंतर जि.प.शाळेच्या मैदानावर भव्य जाहीर सभेला संबोधित करणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.