तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेच्या भक्तांन मध्ये मानवा बरोबरच प्राण्यांचा ही समावेश होवु लागला आहे. मुंबईतील कल्याण भागात वास्तव्यास असणारे देविभक्त प्रकाश जल्दी कुटुंबियांना सापडलेल्या खारुताई सोबत मागील दोन वर्षापासुन देविदर्शनार्थ येत आहेत.
सोमवार दि . 12 जून रोजी नानू नावाचा खारुताईने प्रकाश जल्दी कुंटुंबासोबत तिर्थक्षेञ तुळजापूरला येवुन मदिरात जावुन दर्शन घेवुन नंतर पुजा-याचा घरात या खारूताईनने जल्दी परिवारासोबत देविला दाखवलेल्या नैवध प्राशन केला.
देविदर्शनार्थ मंदिरात आलेल्या खारुताईला बघण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी झाली होती.
मुंबई येथील कल्याण भागात वास्तव्यास असणारे प्रकाश जल्दी हे व्यवसाय करतात
त्यांच्या घरातील झाडावरुन चिमुकली खारूताई अजुन डोळे ही उघडले नव्हते ती खाली पडताच जल्दी कुंटुंबियांनी तिचे पालन पोषण करण्यास आरंभ केला. तेव्हा तिला डृॉपने दुध पाजवुन जगवले.त्यानंतर तिचे नानू असे नामकरण केले. आज नानु सहा वर्षाची झाली आहे. जल्दी परिवाराशिवाय ती एकही दिवस राहत नसल्याने जल्दी परिवार तिर्थक्षेञ तुळजापूरला पुजारी नागनाथ भाऊ भांजीकडे आले. तुळजापूर येताना जल्दी परिवार या नानू खारुताईला घेवुन येतात. तिला मंिउरात नेतात दर्शन घालतातनंतर देविला दाखवलेला नैवेध जल्दी कुंटुंबियांसोबत त्यांच्या मांडीवर बसुन नैवध खाती नैवधतील पापड, कुरवडी चवीने भरपेट खाते नंतर पाणी पेवुन नंतर अंगाखांद्यावर वावरते.
नानू वर्षाच्या नानु नावाच्या खारू ताईला घेऊण तुळजाभवानी दर्शना साठी सहकुंटूब पुजारी भांजी कदम यांचे कडे येतात. खारु ताईने सर्वान बरोबर बसुन जेवण केले. जरवर्षी तिचा वाढदिवस साजरा करतात. ती सापडली तेव्हा डोळे उघडलेले नव्हते झाडावरून खाली पडली तेव्हा पासुन ड्रॉपने दुध पाजुन तिचा सांभाळ केला आज ती 6 वर्षीची झाली आहे नानू खारुताई तुळजाभवानी दर्शनार्थ दोन वेळी आली आहे. यानंतर ही ती येत राहणार असल्याचे जल्दी परिवाराने सांगितले.