धाराशिव / प्रतिनिधी- 

धाराशिवचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी  यांच्या संकल्पनेतुन पोलीस येरमाळा व ढोकी येथील  पारधी  पिढी  येथे  पारधी  समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  मार्गदर्शन करुन त्यांना केंद्र व राज्य शासन राबवित असलेल्या योजने अंतर्गत  सुक्षिशीत  बेरोजगार तरुण- तरुणींसाठी  रोजगार  योजनाबाबत  मार्गदर्शन  करण्यात आले. तसेच शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजणे मधून काम मिळवून देण्यात येईल असे अश्वासित करण्यात आले. पारधी समाजातील बेरोजगार तरुण- तरुणींना प्रशिक्षण देण्याबाबत अश्वासित करण्यात आले.   अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक,उस्मानाबाद यांच्या संकल्पनेमुळे पारधी समाजामधील सुशिक्षीत बेरोजगार यांना नोकरी व स्वयंरोजगाराची  संधी उपलब्ध होणार आहे. तसेच प्रत्येक पारधी समाजातील प्रत्येक व्यक्तीनी त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म दाखला व इतर कागदपत्रे अध्यावत करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. त्या बद्दल पारधी समाजातील  सुक्षीशीत बेरोजगार तरुण- तरुणींनी मा. पोलीस.अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांचे  आभार व्यक्त केले आहेत.

  सदर कार्यक्रमास   अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक, उस्मानाबाद ,प्रो. पोलीस अधीक्षक मनीष कुमार, पोलीस निरीक्षक   साबळे, सपोनि गोरे येरमाळा पोलीस ठाणे. व ढोकी पोलीस ठाणे येथील अधिकारी  अंमलदार व पारधी समाजातील एकुण 100 ते 150 व्यक्ती हजर होते

 
Top