तेर / प्रतिनिधी -
संपूर्ण विश्वाला प्रेम शांती मानवता आणि करूणेचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्ध यांचे विचार मनुष्याच्या सुखाने जगण्यासाठी महत्त्वाचे आहेत असे प्रतिपादन तेर येथे चैत्यगृह येथे बुध्द पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाबुध्द वंदना कार्यक्रमा निमित्ताने डॉ सुधीर शिंदे यांनी सांगितले .
धाराशिव तालुक्यातील तेर येथे बौद्ध पौर्णिमा निमित्ताने महाबुध्द वंदनाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुरूवातीला डॉ सुधीर शिंदे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तथागत गौतम बुध्दांना पुष्पाने, धूपाने आणि दीपाने अभिवादन करण्यात आले सामूहिक वंदना घेण्यात आली. यावेळी पुढे बोलताना डॉ शिंदे म्हणाले की, बुध्दाचे विचाराची प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन सुखी करण्यासाठी आचरण करणे आवश्यक आहे डॉ बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीला समर्पित होऊन धम्म चळवळ गतिमान करायला हवी बुध्दाचे शिकवण हे माणसाला दुख:तून मुक्त करण्यासाठी आहे सुखी व समृद्ध जीवन जगण्यासाठी दैनंदिन जीवनात बुध्दाचे शिकवण आचरण केले तर सुखी जीवन जगता येते तेरचा वारसा हा महत्वाचा असुन तो जतन करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे डॉ शिंदे म्हणाले. यावेळी
बौद्धाच्यार्या गुणवंत सोनवणे , विजय गायकवाड , सुदेश माळाळे , रमाकांत गायकवाड , रविंद्र शिंदे , कानिफनाथ देवकुळे , अंकुश पेठे , चांगदेव खिलारे , यांनी विचार मांडले. यावेळी जिल्ह्यातील धम्म बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल सावंत , सुमेध वाघमारे , ऋषीकेश कांबळे , राहुल गाल्टे , विशाल सोनवणे , दिनेश वाघमारे , मंगेश धावारे , अभिजात सावंत , रवी सोनवणे , अकिंत धावारे , शुभंम सोनवणे , चिकु कांबळे , संदीप गाल्टे , संकेत सोनवणे , गौतम सावंत व सामुहिक महा बुद्ध वंदना अभिवादन समितीने प्रयत्न केले .