कळंब / प्रतिनिधी-

आगामी काळ संभाजी ब्रिगेडचाच असून कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकासाठी सज्ज राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी केले.  

 कळंब येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित संभाजी ब्रिगेडच्या सक्षमीकरण बैठकीत बोलताना प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी सत्तारोहनासाठी संभाजी ब्रिगेड सज्ज असल्याचे मत व्यक्त केले. राज्याच्या राजकारणात संभाजी ब्रिगेडला प्रचंड संधी असून सर्वांनी सामान्य जनतेची कामे करावीत असे आवाहन केले.

  तसेच प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी यांनी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून संपूर्ण ताकदीनिशी लढवाव्यात असे प्रतिपादन केले.    संभाजी ब्रिगेड कळंब तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय कवडे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, जिल्हाध्यक्ष ॲड. तानाजी चौधरी यांच्यासह  प्राचार्य जगदीश गवळी सर (जिल्हा कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ), प्रा.संदीप शेंडगे सर (माजी तालुकाध्यक्ष मराठा सेवा संघ)आशिष पाटील(जिल्हा सचिव),मनोज लोमटे पाटील(जिल्हा उपाध्यक्ष), राहुल चोंदे(कळंब शहराध्यक्ष),विलास गुंठाळ(विभागीय सचिव), इम्रान मिर्झा(छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड कळंब तालुकाध्यक्ष), आकाश मुंडे(जिल्हा उपाध्यक्ष),हनुमंत हुंबे(तालुकाध्यक्ष भूम), संदीप लाकाळ(तालुकाध्यक्ष धाराशिव), सुनिल अडमुठे, शुभम पवार, अशोक कांबळे, बालाजी डिगे, शरद जाधव, अविनाश हुंबे, उमेश हुंबे, मनोज कावळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top