काटी/तुलजापूर 

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणार्पण केले, त्याप्रमाणे निजाम राजवटीतील जनतेनेही स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी लढा उभारला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याइतकेच हैदराबाद मुक्ति संग्रामाच्या लढ्याला महत्व आहे.  हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यातील काटीचे सुपुत्र कै. गणपतराव देशमुखांना 5 मे रोजी हुतात्मे  पत्करावे लागले. पुढील पिढीला मुक्तिसंग्रामाचा धगधगता इतिहास अवगत होण्यासाठी 5 मे हा दिवस हुतात्मा गणपतराव देशमुख बहुउद्देशीय स्मारक समितीच्या वतीने हुतात्मा गणपतराव देशमुख स्मृतीदिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. 

हैदराबाद मुक्तिसंग्रामातील हुतात्मा गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त हुतात्मा गणपतराव देशमुख बहुद्देशीय स्मारक समितीच्या वतीने यंदाही विविध कार्यक्रमात नवनिर्वाचित सरपंच, सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, शिक्षक, विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा शुक्रवार दि. 5 मे रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील प्रांगणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला.

प्रारंभी हुतात्मा गणपतराव देशमुख व भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.

स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी हुतात्मा गणपतराव देशमुख यांचे हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील योगदान आणि त्यांनी गावातील जनतेसाठी केलेल्या कार्याचा आढावा प्रास्ताविकपर मनोगतात व्यक्त करीत हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. तसेच कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विशद केली. नवनिर्वाचित महिला सरपंच, महिला सदस्या  यांनी स्वतः कारभारात लक्ष घालून विकासात्मक कामे करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सरपंच आशाताई सुजित हंगरगेकर, माजी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, प्रमुख पाहुणे प्रा.धनाजी देशमुख, सौ. शिलादेवी देशमुख, संस्थेचे सचिव हितेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अजित देशमुख, बाळासाहेब देशमुख, विजयसिंह देशमुख, बाजार समितीचे माजी संचालक सुजित हंगरगेकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव,जयाजी देशमुख, रावसाहेब देशमुख, अनिल गुंड, जुबेर शेख, अमोल देशमुख,नंदु बनसोडे, बाळासाहेब शिंदे, प्रकाश सोनवणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यांचा करण्यात आला सन्मान हुतात्मा गणपतराव देशमुख बहुद्देशीय स्मारक समितीच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच सौ. आशाताई सुजित हंगरगेकर, सोसायटीचे चेअरमन संजय साळुंके, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सौ. वासंती उमाजी गायकवाड, विद्यार्थीनी नकुशा बनसोडे, नेमबाजी प्रकारात प्राविण्य मिळविलेले काटी सज्जाचे तलाठी प्रशांत गुळवे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. आयोजक देशमुख यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार

या कार्यक्रमाचे आयोजक तथा हुतात्मा गणपतराव देशमुख बहुउद्देशीय स्मारक समितीचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. जयसिंगराव गणपतराव देशमुख यांचा ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सौ.आशाताई सुजित हंगरगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयाजी देशमुख तर आभार पोलीस उपनिरीक्षक अजित देशमुख यांनी मानले.

 
Top