तुळजापूर/ प्रतिनिधी-

मराठा समाजाला ओबीसी मधूनच  आरक्षण देण्याच्या  मागणीसाठी तुळजापूर ते मुंबई मराठा वनवास याञेस  शनिवारी (दि. ६) तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेऊन  आरंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी मुंबई येथे पोहचणार असुन आरक्षण कायदा जोपर्यंत होणार नाही तो पर्यत मुंबई सोडणार नसल्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

मराठा वनवास याञेचे  निमंत्रक योगेशकेदार यांनी  सुनिल नागणे  प्रताप कांचन यांनी श्रीतुळजाभवानी दर्शन घेवुन या मराठा वनवास याञेस आरंभ झाला. यावेळी बाल वारकरी यांनी टाळमृंदग गजर,केला श्रीतुळजाभवानी मंदीर पासुनआरंभ झालेली याञा भवानी रोड मार्ग छञपतीशिवाजीमहाराज पुतळ्या जवळ आली येथे छञपतीशिवाजीमहाराज यांना अभिवादन करुन घाठशिळ मार्ग सिंदफळ स्थित श्रीमुदगुले श्वर मंदीरात पोहचली तिथे विश्रांती घेवुन सांयकाळी पुनश्च मार्गक्रमण सुरु झाले राञी सांगवी येथे पोहचली तिथे भोजन करुन विश्रांती घेतली .

 या याञेस मराठा संघटनांनी विरोध केल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्तात  मंदीर परिसरात तैनातकरण्यात आला होता. याञा मार्गावर वनवास याञेचा निषेध  मराठा वनवास याञेला मराठा संघटनेच्या विविध पदाधिकारी कार्यकत्यांनी  याञा  मार्गस्थ असताना भवानी रोडवर " समाजात फुट पाडणा-यांचा धिक्कार असो "एकच धुन ६ जुन शिवराज्यभिषेक सोहळे रायगड"

मराठा समाजाचा नावाखाली चालणारी दुकानदारी बंद करा , आरक्षण आमच्या हक्काचे ते तर आम्ही घेणारच  एक मराठा लाख मराठा असा फलक हातात घेवुन या याञेचा जाहीर निषेध केला.यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त असल्याने वनवास याञा निर्विघ्नपणे मार्गस्थ झाली.

 
Top