धाराशिव (प्रतिनीधी) :-  धाराशिव तालुक्यातील पिंपरी ग्रामपंचायत पोट निवडणूक दिनांक 18 मे रोजी पार पडली... 19मे रोजी तहसील कार्यालय धाराशिव येथे मतमोजणी झाली.अतिशय चुरशीच्या ह्या निवडणुकीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी यांच्या मातोश्री सौ स्नेहलता हरिदास नाईकवाडी मोठ्या फरकाने विजयी झाल्या ही निवडणूक जिंकण्यासाठी गावातील माजी चेअरमन हरिदास नाईकवाडी,राजकुमार गरड, सौदागर चव्हाण,सदाशिव फुटाणे,चंद्रकांत गांधले,अजित पाटील,पांडुरंग चव्हाण, भुजंग निंबाळकर,आकबर शेख, बंडू कुंभार,असिफ शेख, भैरवनाथ गरड,सुज्जौद्दिन शेख,भागवत बिडबाग,अण्णा चव्हाण,जोतिबा चव्हाण,शहाजी काशीद,शिवाजी खेडकर,भीमा बेलदार, किरण चव्हाण,अमित गांधले, दत्ता गांधले,काका दुरागुळे,नवनाथ गरड,नागेश माळी,संभाजी गरड,ओमकार माळी,सचिन फुटाणे,भैय्या सुरवसे,बाबू शेख,काका सरफाळे, बाबू भुसनर,श्रीहरी गरड,रामभाऊ बेलदार,विठ्ठल साडेकर,बालाजी बिडबाग,तानाजी घोगरे आदींनी परिश्रम घेतले.

या यश बद्दल भाजयुमो चे तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी यांचे आमदार राणाजगजिसिंह पाटील साहेब,भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे,नेताजी पाटील,सुनील काकडे, राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी शुभेच्छा दिल्या....

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी उदयसिंह चौरे ग्रामसेवक माळी यांनी काम पाहिले.

 
Top