धाराशिव (प्रतिनीधी) :- जिल्ह्यासाठी भाजपा-शिवसेना सरकार कडुन भरघोस विकास निधी मंजुर करण्यात आल्याने धाराशिव भाजपा व युवा मोर्चाच्या वतीने धाराशिव शहरात पेढे वाटुन जल्लोष साजरा करण्यात आला त्याच बरोबर या विकास निधी साठी विशेष परिश्रम घेनारे आ.राणाजगजितसिंहजी पाटील यांचे भाजपा,युवा मोर्चा कार्यकर्त्यांसह नागरिकांकडुन आभारही व्यक्त करण्यात आले. धाराशिव जिल्ह्यासाठी मंजुर करण्यात आलेला विकास निधी पुढिलप्रमाणे, धाराशिव 147 कोटी रु,तुळजापुर 139 कोटी रुपये व नळदुर्गसाठी 97 कोटी रुपये असा एकुण 383 कोटी रुपये विकास निधी मंजुर झाला असुन पुढिल काळात आ.राणाजगजितसिंहजी पाटील यांच्या नेतृत्वात विवीध विकास कामे करुन जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलला जाईल यात शंका नाही, निधी मंजुर झाल्याचा आनंदोत्सव साजरा करतेवेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, मा. उपनगराध्यक्ष अभय इंगळे, नगर सेवक बापु पवार, अभिजीत काकडे, शेषेराव उंबरे, दाजी आप्पा पवार, विलास सांजेकर, वैभव हंचाटे, उदय देशमुख, विनोद निंबाळकर, पुष्पकांत माळाळे, मेसा जानराव, सुनिल पुंगुडवाले, ओम नाईकवाडी,सचिन लोंढे, स्वप्निल नाईकवाडी, हिंम्मत भोसले, रोहित देशमुख, गणेश एडके, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश पवार, सागर दंडनाईक, प्रसाद मुंडे, निरंजन जगदाळे, चैतन्य माने, प्रमोद बचाटे, ज्ञानेश्वर सुळ, धनराज नवले, ओंकार देवकते, आदित्य इंगळे, आनंत भालेराव, रमन जाधव, बिन्नी लवसकर, राजु जोशी आदी भाजपा, युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top