धाराशिव प्रतिनीधी :-  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या नियमित पाठपुरावा आणि प्रयत्नांना यश मिळाले असून आज राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत उस्मानाबाद जिल्ह्यातील नगरपरीषदांकरीता 738 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पालकमंत्री डॉ.सावंत यांनी दि.26 जानेवारी 2023 रोजी उस्मानाबाद नगरपरीषद व जिल्हयातील नगरपरीषदांकरीता सविस्तर प्रकल्प अहवाल  (  ) तयार करण्याबाबत  जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपरीषद) यांना सुचना देऊन तात्काळ अहवाल सादर करण्याबाबत निर्देशित  केलेले होते.त्यानुसार प्रशासनाने भूम ,परंडा,उस्मानाबाद ,तुळजापूर ,नळदुर्ग व उमरगा नगरपरीषदांचा सविस्तर प्रकल्प अहवाल डी.पी.आर (डीटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) अहवाल शासनाकडे सादर केला.*

सदर प्रकल्प हा महाराष्ट्र  सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत डि.पी. रस्त्याचे चे सिमेंट क्रॉक्रीट रस्ते  व पक्की नाली पध्दतीने बांधकाम करणे अश्या  स्वरुपाचे आहे.त्यानुसार सविस्तर अहवाल शासनाकडे दाखल झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे यासदर्ंभात वारंवार पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून यापूर्वीच भूम व परंडा या नगरपरीषदांना अनुक्रमे 114.65 व 92.52 कोटी रुपये शासनाद्वारे मंजूर करण्यात आले आहे. 

उर्वरित नगरपरीषदाकरीता आज दि.18 मे 2023 रोजी राज्यस्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. आजच्या  बैठकीमध्ये उस्मानाबाद नगरपरीषद करीता 146.66 कोटी रुपये, तुळजापूर नगरपरीषद करीता 158 कोटी रुपये ,नळदुर्ग नगरपरीषद करीता 97.67 कोटी ,उमरगा नगरपरीषद करीता 128.52 कोटी रुपये, असे एकूण 738.2 कोटी रुपयांचा महत्वकांक्षी प्रकल्प मंजुर झाला आहे.

 
Top