परंडा /प्रतिनिधी -

उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे आनंदी मिशन अंतर्गत  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राज गलांडे व वैद्यकीय अधिक्षक डॉ व्ही.डी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि.४ रोजी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

     सदरील शिबीरात NCD अंतर्गत ३० वर्षांवरील महिलाअधिकारी व कर्मचारी तसेच इतर एकूण १०८ महिला यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ राज गलांडे यांनी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन केले.  सामाजिक कार्यकर्त्या आशाताई मोरजकर यांनी मनोगत व्यक्त करुन  रुग्णांना मार्गदर्शन केले . नपा मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांनी उपस्थित रुग्णांना कर्करोगावर मात करण्यासाठीच आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे असे सांगितले.

 या  शिबीरात बार्शी येथील कर्करोग तज्ञ डॉक्टर राहुल मांजरे यांनी उपस्थित रुग्णांना कर्करोगाविषयी मोफत सेवा दिली. या शिबीराचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद मोरे यांनी केले . या शिबीरात तालुका आरोग्य अधिकारी अधिकारी डॉ  विनय  कुलकर्णी , वैद्यकीय अधिकारी डॉ देवदत्त कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी अमिता वराडे, NCD कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर घाटगिळे, राष्ट्रीय तंबाखू नियंञण कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर विक्रम राठोर, कुलकर्णी,  अधिपरिचारीका रूपाली सौताडेकर, जयश्री लावंड, ज्योती जगदाळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. 


 
Top