धाराशिव / प्रतिनिधी-

 धाराशिव जिल्ह्यात “छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर” या कार्यक्रमाचे दि. 8 मे 2023 रोजी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते उद्धाटन येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सकाळी 10.00 वाजता आयोजित करण्यात आले आहे.

  या कार्यक्रमात जिल्ह्यातील युवकांसाठी दहावी आणि बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या बँका तसेच योजना यांची माहिती, कल मापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना माहिती आणि करिअर प्रदर्शनी या विषयावर मार्गदर्शन आयोजित केलेले आहे.

  तेंव्हा छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीरास तरुण युवक-युवती व पालकांसह मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पी.जे. औताडे यांनी केले आहे.


 
Top