धाराशिव / प्रतिनिधी-

येथील श्रीपतराव भोसले हायस्कुलच्या सन 1975 ते 1979 या सालात एका बाकावर बसून शिक्षण घेणारे विद्यार्थी सामाजिक माध्यमांचा उपयोग करुन (व्हाट्सअप, फेसबूक व इंन्स्टाग्राम) एकत्र जमले.  त्यासाठी सर्व प्रथम व्हाट्सअपवर एक ग्रुप तयार करण्यात आला.  त्यामध्ये मोलाची कामगिरी, डॉ. सुनिता, डॉ. स्मिता, डॉ. सुभाषीनी, श्री. धनाजी देशमुख यांनी केली.  त्यानुसार सर्वांच्या डोक्यात मैत्रीचे स्नेहमीलन करण्याची कल्पना आली.  व त्यानुसार हे स्नेहमिलन दिनांक 22 व 23 एप्रिल 2023 रोजी तेरणा पब्लीक स्कुल धाराशिव येथे सर्वसहमतीने आयोजित करण्याचे ठरले. सदरील तेरणा पब्लीक स्कुल हे तेथील सचिव व आमचे वर्गमीत्र श्री अनंत उंबरे यांनी विनामुल्य उपलब्ध करुन दिले, त्यानुसार धाराशिव मधील संयोजक टीम सर्वश्री अनंत उंबरे, ताराचंद सारडा, वल्लभ पवार, शाम घोगरे, राजकुमार दहिहांडे, बाळासाहेब देशमुख, शांता तांबारे, सरोज कुलकर्णी, गणेश आचार्य, किशोर राऊत, अनंत गायकवाड, राजेश मुंडे इत्यादी अनेक स्थानिक वर्गमीत्रांनी परिश्रम घेऊन स्नेहमीलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला.  या स्नेह मिलनाला एकुण 65 वर्गमीत्रांनी हजेरी नोंदवली.  साधारण वयाच्या 16 व्या वर्षा नंतर एकदम 58 ते 60 च्या वयोगटामध्ये सर्व मीत्र मैत्रीनी (आज्जी आजोबा झालेले) एकत्र भेटलो याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे.  या स्नेह मीलनामध्ये आम्हाला शिकवलेल्या साधारण 15 गुरुवर्यांनाही त्यांच्या घरी जाऊन आमंत्रीत केले व त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.  असा आगळा वेगळा सोहळा 44 वर्षांनंतर झाला.  हा चर्चेचा विषय आहे.  धाराशिव जिल्ह्यातीलच काय तर संपुर्ण महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण असेल.  सदरील स्नेह मेळाव्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थित शिक्षक वृंदांना फेटे बांधून ग्रुप फोटो काढण्यात आले तसेच कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपला 10 वी पासून आजपर्यंतचा साधारण 44 वर्षांचा जिवन प्रवास सर्वांसमोर मांडला व शिक्षकवृंदांनी मोलाचे मार्गदर्शन केले यामध्ये सर्वश्री पडवळसर, एम.डी. देशमुखसर, सोनारसर, डोकेसर, गिलबीलेसर, सुरवसेसर, जगतापसर, गाडेसर, बोबडेसर, चोंदेसर, शेळकेसर, खोगरेसर, ए.आर.पाटीलसर, एस.व्ही. देशमुखसर यांचा समावेश होता. या कार्यक्रमामध्ये बाहेरगावाहून आलेल्या सर्व मीत्र-मैत्रीनींसाठी राहण्याची व उत्तम जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.  या कार्यक्रमामध्ये मनोरंजनाचा देखील कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवून आनंद घेतला. या सर्व आठवणी कायमस्वरुपी स्मरणात राहण्यासाठी फोटोग्राफी व व्हीडीओ शुटींग देखील करण्यात आली.  या अविस्मरर्णीय भेटीनंतर उर्वरीत आयुष्यात सर्वांनी दरवर्षी भेटून स्नेह मेळावा घेण्याचे ठरले व त्यानंतर सर्वांनी जड अंत:करणाने एकमेकांचा निरोप घेतला.

 
Top