धाराशिव / प्रतिनिधी-

सर्वाेच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत दिलेल्या निकालावरून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी सरकार कायदेशीरच आहे, असे म्हटले आहे. तर शिंदे गटाचे सुरज साळुंके यांनी महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाले आहे. तर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी राज्यपाल किती नियमबाह्य वागले हे कोर्टाने सिध्द केले आहे. जनतेच्या न्यायालयात मात्र आम्हालाच यश मिळेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून पेढे वाटपून आनंदोत्सव साजरा केला.  यावेळी पप्पू मुंढे, भिमा जाधव, कुणाल धोत्रीकर, कमलाकर दाणे यांच्यासह शिवसैनीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेच्या न्यायालयात विजय आमचाच

सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे. तो आमच्या पक्षाला दिलासादायक आहे, या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, पण  जनता हेच आमच खर न्यायालय आहे. सरकार मध्ये हिम्मत असेल तर राजीनामा द्यावा व लगेच निवडणुकीला सामोरे जावे, कारण जनतेच्या न्यायालयात आम्हालाच न्याय मिळाणर असलयाचा विश्वास खासदार ओमराजे निंबाळकर व अामदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रमाणे नैतिकता दाखवून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तशी तुमच्यात हिम्मत नाही, अशी टिका ही त्यांनी केली. 

 
Top