तुळजापूर /  प्रतिनिधी

 जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे ब्रिटिश परिचारिका व समाजसेविका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून व कॅण्डल लावून परिचारिका दिन साजरा करण्यात आला# 

यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका जाधव जयश्री सिस्टर ,संध्या भड सिस्टर ,रेखा लोंढे सिस्टर ,सविता क्षीरसागर सिस्टर, कलावती कासदेकर सिस्टर ,सर्व अधिपरिचारीका  यांचा रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांच्या वतीने मिठाई बॉक्स देऊन व त्यांच्या रुग्णसेवेचा गौरव म्हणून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून साजरा केला ,यावेळी रुग्णालय अधीक्षक डॉ. श्रीधर जाधव सर, रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले, डॉ.बर्वे सर ,अमित मोगरकर व रुग्णालयातील सर्व कर्मचारी सहकारी उपस्थित होते

 
Top