अचलबेट  / प्रतिनिधी

देवस्थान तुरोरी / कराळीच्या पायथ्याशी होत असलेले ऑर्केस्ट्रा बारला परवानगी देऊ नये. तसेच तुरोरी व परिसरातील गावठी दारु विकी, मटका, जुगार अड्डे, छम छम, वेशाव्यवसाय, गुडगुडी, पत्त्यांचे क्लब तात्काळ बंद करावेत. अन्यथा २६ मेपासुन तुरोरी व परिसरातील नागरिक उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरगा समोर उपोषणास बसण्याचा इशारा तुरोरी व परिसरातील ग्रामस्थ व अचलबेट देवस्थानच्या भक्तांनी जिल्हाधिकाऱ्याना दिला आहे.

उमरगा तालुक्यातील  तुरोरी व परिसरात शेकडो वर्षापासुन महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सिमेजवळ महान तपस्वी श्री. काशीनाथ बाबा महाराज यांनी स्थापन केलेली व त्यांचा वारसा पुढे चालवलेले परम पुजनीय स्वर्गीय उज्वलानंद महाराज या दोन तपस्वी चैतन्यमुर्तीच्या परस्पर्शाने पावन झालेल्या अखंड महाराष्ट्र-कर्नाटक, तेलांगणा भाविकांच्या श्रध्देचे प्रती वैकुंठ असलेल्या "अचलबेट देवस्थान" च्या पश्चिमेकडील पायथ्याला बार व रेस्टॉरंट गेल्या कांही वर्षापासुन चालु आहे. शासनाने या ठिकाणी ऑर्केस्ट्रा बार काढण्याची परवानगी दिलेने त्या ठिकाणी तयारी चालु असल्याचे दिसुन येत आहे. तुरोरी पंचक्रोशीतील नागरिक व वारकरी सांप्रदयाचा अचलबेट देवस्थानच्या पायथ्याशी ऑर्केस्टबारला परवानगी देण्यास ठाम विरोध आहे. सदर ऑर्केस्ट बारला मान्यता देऊ नये. ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षण तज्ञ व सर्वसामान्य मान्यवर व परिसरातील धर्मगुरुंची विनंती वजा मागणी आहे. तसेच गेल्या कित्येक वर्षापासुन पोलीस प्रशासनाला ब-याच वेळा विनंती करुनही तुरोरी व परिसरातील खेडेगावांतील अवैध धंदे पोलीसांच्या आशिर्वादाने राजरोसपणे चालु आहेत. गेल्या अनेक वर्षापासुन तुरोरी व परिसरामध्ये गावठी दारु, वेशा व्यवसाय, जुगार अड्डे, मटका, चंदन विक्री व इतर अवैध धंदे यांचा सुळसुळाट झाला असुन अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. अनेक महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी दारु व जुगारांच्या विळख्यात गुरफटुन आहारी गेल्याने त्यांचे जीवन उध्वस्त होत आहे. परिणामी व्यवसाच्या पुर्ततेसाठी चो-या, दरोडे टाकणे अशा प्रकारच्या गैरमार्गांकडे वळत आहेत. त्यातुन मिळालेल्या पैशांतुन गुंड प्रवृत्तीचे लोक तयार होऊन विविध राजकीय पक्षांशी संलग्न होऊन समाजात व राजकीय क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्याच्या व धार्मीक व जातीय तेड निर्माण करीत जाती-जातींमध्ये भांडण निर्माण करण्याचाही प्रयत्न अनेक वेळा झालेला आहे. पुढील काळात या प्रवृत्तीमुळे सुपा-या घेऊन खुन करणे, दरोडे टाकणे आदीं सारखे गंभिर गुन्हे घडलेले आहेत. व यापुढेही घडण्याची दाट शक्यता आहे. सदर घटनेची गंभीर दखल घेऊन तुरोरी येथील अचलबेट देवस्थानच्या पायथ्यास असलेल्या बार ॲन्ड रेस्टॉरंटला कोणत्याही परिस्थितीमध्ये डान्स बार/ऑर्केस्ट्राची परवानगी देण्यात येवू नये, तसेच तुरोरी व परिसरातील गावठी दारु विकी, मटका, जुगार अड्डे, छम छम, वेशाव्यवसाय गुडगुडी, पत्त्यांचे क्लब तात्काळ बंद करावेत. अन्यथा २६ मेपासुन तुरोरी व परिसरातील नागरिक उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरगा समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर तुरोरीचे उपसरपंच तुकाराम जाधव, माजी उपसभापती युवराज जाधव, अशोक जाधव, प्रदिप जाधव, सौ. विजया जाधव, नेताजी सुर्यवंशी, राहुल कांबळे, तुकाराम ममाळे, सौ. संगिता कलमले, दत्तु पवार, सुनिल जाधव, माजी सरपंच माधव जाधव, प्रविण साठे, तुकाराम गायकवाड, गोपीका जमादार, संजय कोल्हे आदीसह ५६० नागरीकांच्या सहया आहेत.

 
Top