धाराशिव / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन  केशेगाव येथे करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात केशेगाव व परिसरातील सर्व वयोगटातील ४९० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच मल्लिनाथ गावडे, यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख उपसरपंच लक्ष्मण क्षीरसागर, ग्राम पंचायत सदस्य मल्लिनाथ महाबोले, शंकर घंटे, ग्राम पंचायत कर्मचारी संजय जाधव, कैलास स्वामी, वैजीनाथ जळकोटे, तंटामुक्त समिती अध्यक्ष भालचंद्र कोळी(एक्स आर्मी),  रेवणसिद्ध जाधव (एक्स आर्मी) शिवानंद बिराजदार, चिदानंद हांद्रळे, योगीनाथ जळकोटे, शिव हुकीरे, राम भदाडे, रामय्या स्वामी, भिमराव पाटील, अनिल जळकोटे, शर्णय्या स्वामी,  दत्तात्रय पांचाळ, यशवंत पाटील, वकील, रौफ शहा फकीर, इब्राहिम नदाफ, धोंडीबा जाधव, काळू जाधव इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.‍ अजित निळे, डॉ.फयाज खान, डॉ.आकीब, डॉ. ओम कोनापूरे, डॉ. मयुर पाटील, डॉ. विजय बोराडे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे आमिन सय्यद, विनोद ओव्हाळ, निशिकांत लोकरे, सचिन व्हटकर व आशा कार्यकर्ती संतोषी कांबळे, शितल हुकीरे यांनी परीश्रम घेतले.


 
Top