परंडा / प्रतिनिधी - 

तालुक्यातील आवारपिंपरी शिवारात मालवाहतूक करणार्‍या दोन पिकअप वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी दि.८ रोजी रात्री घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार परंडा येथील जुबेर दखनी हे कुर्डूवाडीहून परंडा येथे बर्फ घेऊन येत असताना आवारपिंपरी शिवारात समोरून येणार्‍या मालवाहतूक पिकअपने धडक मारली. त्यामुळे बर्फ वाहतूक करणारा टेंपो पलटी झाला. या अपघातात जुबेर दखनी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसर्‍या वाहनाचा चालक फिरोज पठाण हा किरकोळ जखमी झाला. आवारपिंपरी येथील ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. 


 
Top