धाराशिव / प्रतिनिधी-

 छत्रपती शंभुराजे जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १०५ बहाद्दर मावळ्यांनी रक्तदान करून शंभूराजांना दि.१३ मे रोजी अभिवादन केले.

छत्रपती शंभुराजे जन्मोत्सव समिती प्रणित नाका बॉईज ग्रुपच्यावतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या‌वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शंभूराजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर शिबिराचे उद्घाटन बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे व माजी उपनगराध्यक्ष राजाभाऊ बागल यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा केमिस्ट ॲंण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष धनाजी आनंदे, युवा उद्योजक शेखर घोडके, माजी नगरसेवक राणा बनसोडे, श्रीकांत मुंडे, रवी मुंडे, अभिराज कदम, निलेश शिंदे व अविष्कार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान संकलन शहरातील रेणुका ब्लड बँकेचे डॉ संजय शिंदे, लॅब टेक्निशियन योगेश सांगळे, ऋषी चोले, स्वाती ठोंबरे, संध्याराणी गाढवे यांनी केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी शुभम मुंडे, जयंत देशमुख, विक्की उंबरे, सनी मुंडे, सुयश घंटे, संतोष वाघमारे, विशाल लाकाळ, सुदाम काकडे, सत्यजित चव्हाण, आदित्य हंबीरे, आदित्य शेंद्रे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top