तुळजापूर / प्रतिनिधी-

 सुप्रसिद्ध सरकारी वकिल अँड उज्वल निकम यांनी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे सहकुटुंब श्रीतुळजाभवानी मातेस कुलधर्मकुलाचार करुन मनोभावे दर्शन घेतले. त्यांच्या पुजेचे पौराहित्य त्यांचे पुजारी नंदकुमार गंगणे यांनी केले .

 श्री तुळजाभवानी दर्शनानंतर मठात जावुन अन्नपुर्णा देविचे दर्शन घेवुन देविचे मुख्य महंत श्रीतुकोजीबुवा , महंत वाकोजी बुवा यांची भेट घेतली. नंतर देविचे महंत श्रीतुकोजी बुवा यांनी अँड. उज्वल निकम यांना देविची प्रतिमा भेट दिली.यावेळी अँड निकम यांची पत्नी,  मुलगा, सुन,  मुलगी,  जावाईसह श्री तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळ अध्यक्ष विशाल रोचकरी, अँड. घोडके विनोद गंगणे, अविनाश गंगणे  आदी उपस्थितीत होते.

 
Top