धाराशिव / प्रतिनिधी-

वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील फटाक्याच्या गाेडाऊनला आज सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आतील तेरा ते चाैदा महिला तसेच पुरूष कामगार वेळीच बाहेर पडल्याने ते बालंबाल बचावले. मात्र, दोन व्यक्ती जखमी झाली असून त्यास उपचारासाठी तेरखेडा प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल केले आहे.

 तेरखेडा येथील बसस्टॅन्डपासून अवघ्या काही अंतरावर भलेमाेठे फटाक्यांचे गाेडाऊन आहे. याच गाेडाऊनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फटाके तयार करून स्टाॅक करून ठेवला जाताे. दरम्यान, याच गाेडाऊनला साेमवारी सकाळी साधारपणे पावणेबारा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच आतील महिला तसेच पुरूष कामगार प्रसंगावधान बाळगत गाेडाऊनबाहेर बाहेर पडले. मात्र, एक व्यक्ती जखमी झाली आहे. संबंधितास तातडीने तेरखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले. ताेवर धाराशिव पालिकेचे अग्निशामक पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत संपूर्ण गाेडाऊन जळून भस्म झाले.

 
Top