धाराशिव / प्रतिनिधी- 

 आपला धाराशिव जिल्हा कमी पर्जन्यमान असलेला क्षेत्र आहे, शेतक-यांना पिकांसाठी पावसाळा संपल्यानंतर मुबलक पाणीसाठा उपलब्ध नाही,त्यामुळे जिल्ह्यात शेततळे तयार करण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहित करा,या मोहिमेचा चळवळीत रुपांतर करा असे निर्देश पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरिप हंगाम पूर्व आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.

 यावेळी आ. ज्ञानराज चौगुले, आ. कैलास पाटील, जि.प माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हा अधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्य चिकित्सक राजाभाऊ गलांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, जिल्हा कृषी अधिकारी महेश तीर्थकर, उपजिल्हाधिकारी(रोहयो) महेंद्रकुमार कांबळे,जिल्हा उपनिबंधक सुनिल शिरापूरकर आणि सर्व विभागातील कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

 या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी ई-पिक पाहणी, खते, किटकटनाशके, बियाणे,कर्ज वाटप, शेततळे, आणि इतर योजनांचा सविस्तर आढावा घेतला. शेततळे भविष्यात अत्यंत उपयोगी ठरणार असून यापूर्वी ज्या शेतक-यांनी शेततळे तयार केलेले आहेत. त्या सर्वांना तात्काळ अनुदान वितरीत करावा, जेणे करुन इतर शेतकरीही आपल्या शिवारात शेततळे तयार करतील. ई-पिक पाहणी संदर्भात पालकमंत्री म्हणाले तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांनी गांभीर्याने या कामाकडे लक्ष द्यावे, शेतक-यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन वस्तुस्थितीदर्शक आणि अचूक आकडेवारी घ्यावी. पिकांचे उत्पादनाबाबत बोलतांना पालकमंत्री म्हणाले कृषी विभागाकडून 20 टक्के शेतक-यांचा सर्वे घेतला जातो आणि त्या आधारावर जिल्ह्याची उत्पादन क्षमता गृहीत धरली जाते. प्रत्यक्षात बाजारत आलेला धान्य किंवा  तसे न करता सर्वेची टक्केवारी वाढावी असे निर्देशही त्यांनी दिले.

 जिल्ह्यात निकृष्ट बीयाणे, भेसळयुक्त खते आणि बनावट कीटकनाशक विक्री करणा-यांची गय केली जाणार नाही,जिल्ह्यातील शेतक-यांना खरीप व रब्बी हंगामामध्ये कृषी निविष्ठा दर्जेदार व रास्त दरात मिळण्याच्या दृष्टीने गुणनियंत्रणाच्या कामांना गती द्यावी, बोगस कंपन्यांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करा तसेच प्रत्येक तालुक्यात अधिका-यांच्या भरारी पथकांची नेमणूक करून एका तालुक्याच्या पथकाने दुस-या तालुक्यात जाऊन आक्समिक भेट देऊन खते बियाणे व किटकनाशकांची तपासणी करावी असे आदेशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

  गोगलगाय, किडी आणि सोयाबीन पिकावरील येलो मोझॅकवर प्रतिबंध करण्यासंदर्भात शेतक-यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याचे नियोजन करा, याबाबत गावागावात मोठे होर्डींग आणि फ्लेक्स लावा शक्यतो त्यांच्यातील प्रगतशील शेतक-यांना पुढे करून त्यांच्या अनुभवातून इतर शेतक-यांना मार्गदर्शन करण्यास प्रोत्साहित करा. यासाठी शेतक-यांचे विशेष मेळावे घ्या, आणि उतकृष्ट व प्रगतशील शेतक-यांचा बक्षीस देऊन सत्कार करा असेही डॉ. सावंत म्हणाले.

 पालकमंत्री डॉ.सावंत म्हणाले ज्या ठिकाणी एख्याद्या पिकाचे उत्पादन जास्त असेल त्या भागातील शेतक-यांना ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करण्यास प्रोत्साहित करावे.या बैठकीत पिक कर्ज वाटपाबाबत काही बॅंकांच्या भुमिकेवर पालकमंत्री महोदयांनी नाराजी व्यक्त केली.ज्या बॅंक खरिप पिकासाठी कर्जवाटपाचे लक्षांक साध्य करत नाहीत आणि (CIBIL) सिबिल स्कोअर च्या नावाखाली कर्ज देण्यास टाळाटाळ करतील अशा बॅंकांविरुद्ध जिल्हा उपनिबंधका कार्यालयाने कार्यवाही प्रस्तावित करावी,याबाबत मी वित्त मंत्र्यांशी चर्चाही करणार असल्याचे डॉ.सावंत म्हणाले.

 जिल्ह्यात कांदाचाळ, शेततळे, शेततळे अस्तरीकरणावर कृषी विभागाने काम करण्याची आवश्यकता असून या महत्वाच्या योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करा असेही मंत्री महोदय म्हणाले.


 
Top