धाराशिव / प्रतिनिधी- 

 कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जा‍हीर झाला असल्यामुळे दि.10 मे 2023 रोजी मतदान आणि दि.13 मे 2023 रोजी मतमोजणी होत आहे. त्याअनुषंगाने सीमेलगत असलेल्या उमरगा तालुक्यातील अनुज्ञप्ती 5 कि.मी.अंतरातील अनज्ञप्त्या बंद करण्यासाठी मतदान संपण्याच्या वेळेपूर्वीच्या 48 तासांमध्ये मद्यविक्री करण्यास मनाई, कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत लोकप्रतिनिधीत्व अधिनियमांतर्गत केलेल्या विविध नियमानुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील उमरगा तालुका सीमावर्ती भागातील सीमेलगत असलेल्या 5 कि.मी.च्या आतील उमरगा तालुक्यातील सर्व प्रकारच्या अनुज्ञप्ती दि.08 मे 2023 पासून मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर सायंकाळी 7.00 वा.पासून ते ‍दि.10 मे 2023 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत तसेच दि.13 मे 2023 रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद करण्याबाबतचे आणि त्यावरील मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहेत.

 जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुचराई करतील त्यांच्या विरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 54(1)(सी) नुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी,असे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी कळविले आहे.     


 
Top