धाराशिव (प्रतिनिधी)- दि. 15 नोव्हेंबर 2025 जपान (टोकियो) येथे सुरू झालेल्या 25 व्या डेफ ऑलिपिंक करीता धाराशिवचा सुपुत्र चेतन हणमंत सपकाळ याची 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूल व 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल या दोन नेमबाजी प्रकारांमध्ये निवड झाली आहे.
डेफ ऑलिंपिक मध्ये मुला मधुन निवड झालेला हा महाराष्ट्रातील पहिला पिस्तूल नेमबाज खेळाडू आहे. जपान येथे आज झालेल्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यात जगातील एकूण ऐक्याऐंशी देशातील खेळाडूंचा सहभागी झाले आहेत. चेतन सपकाळ ने आज अखेर आंतरराष्ट्रीय पातळीवरील (जागतिक वर्ल्ड डेफ शुटींग चॅम्पियनशिप) स्पर्धेत तीन, राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत चौदा तर, राज्य पातळीवर स्पर्धेत चार अशी एकूण एकवीस पदकांची कमाई केली आहे.
प्रचंड मेहनत व खडतर प्रवास
पिस्तूल नेमबाजी खेळ हा अत्यंत खर्चिक तर आहेच पण त्याचबरोबर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या अत्यंत जोखमीचा क्रिडा प्रकार आहे. चेतन ला कसल्याही प्रकारचे ऐकता नाही व बोलताही येत नाही. त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती,जिद्द,खेळा वरील निष्ठा, व कष्ट यामुळे तो आज भारतीय नेमबाजी संघाचा भागीदार ठरला आहे.
पालकांचा त्याग आणि पाठबळ
गेल्या वीस वर्षांपासून चेतन ची आई चेतन च्या खेळा करीता त्याची मार्गदर्शक म्हणून सावली सारखी खंबीर पणे त्यांच्या सोबत राहिल्या आहेत.धाराशिव ते पुणे हा विशेष शिक्षणाचा प्रवास व शिक्षणा बरोबर त्याच्या मधिल कौशल्य विकसित करून नेमबाजी सारख्या खर्चिक खेळा मध्ये एका कर्णबधीर मुलास आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि ऑलिंपिक पर्यंत चा प्रवास हा एका दिव्यांग मुलांचा व असामान्य आईचा प्रवास आहे. म्हणून ची चेतनची कामगिरी कौतुकास्पद आहे.
महाराष्ट्र शासनकडून दखल नाही.
महाराष्ट्र शासन कोणत्याही आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक प्राप्त खेळाडूस शासकीय नोकरी मध्ये सरळ सेवेने समाविष्ट करून घेण्यात यावे, हे धोरण असताना देखील दोन वर्ष झाली पुणे येथील क्रिडा संचालनालय पुणे येथे चेतनचा प्रस्ताव सादर केला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदक प्राप्त खेळाडूस दिले जाणारे पारितोषिक रक्कम आज अखेर मिळालेली नाही.
एवढेच नव्हे तर, ऑलिंपिक पुर्व प्रशिक्षण व साहित्य खरेदी करता दिली जाणाऱी रक्कम शेवटच्या दिवसापर्यंत मिळू शकली नाही. कर्ज काढून ऑलिंपिक चा खर्च चेतन चे आई वडील गेल्या तीन महिन्यांपासून क्रीडा मंत्री, क्रिडा आयुक्त, यांच्या कार्यालयात अनेकदा भेटून देखिल कसल्याही प्रकारची मदत मिळू न शकल्याने खाजगी बँके कडून चेतन च्या वडीलांच्या पेन्शन वर कर्ज काढून ऑलिंपिक करीता पाठविले आहे.
