धाराशिव / प्रतिनिधी-

शहरातील युवक नेते सचिन तावडे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात जाहीर प्रवेश केला. याबद्दल राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे यांच्या हस्ते त्यांचा धाराशिव येथील पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला.

 यावेळी बोलताना सचिन तावडे म्हणाले की, सर्व धर्मीयांना सोबत घेऊन चालणार्‍या नेतृत्वाची देशाला गरज असून ही ताकद केवळ राष्ट्रवादी काँगे्रस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडेच आहे. त्यामुळेच आपण पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार, मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, खा.सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली व पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा नंबरवन ठेवण्याचे काम आम्ही करू असा आत्मविश्वास श्री.तावडे यांनी व्यक्त केला.

 यावेळी ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, प्रदेश सचिव मसूद भाई शेख, जिल्हा उपाध्यक्ष वाजिद पठाण,शहराध्यक्ष आयाज शेख, शहरउपाध्यक्ष मनोज मुदगल,सेवादल सेल, जिल्हाध्यक्ष सतीश घोडराव, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद पठाण, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष अविनाश तांबारे, संस्कृतिक विभाग सेल जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख, लीगल सेल शहर अध्यक्ष योगेश सोन्ने पाटील, सामजिक न्याय शहर कार्याध्यक्ष नारायण तुरुप, उमरगा युवक तालुकाध्यक्ष शमसोड्डीन जमादार, ओ.बी.सी सेल तालुका उपाध्यक्ष रवी ठेंगाळ, पंकज भोसले, विवेक साळवे,बिलाल तांबोळी,अमोल सूरवसे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top