धाराशिव / प्रतिनिधी-

 निर्घृणपणे खुन केल्याच्या आरोपात दोषी ठरवत उमरगा येथील न्यायालयाने 3 आरोपीना जन्मठेपेची व प्रत्येकी 5000 हजार आर्थिक दंडाची शिक्षा सुनावणी आहे. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून अतिरिक्त शासकीय अभियोक्ता संदीप देशपांडे यांनी बाजू मांडली त्यामुळे आरोपीना शिक्षा झाली.

 धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील सास्तूर येथे 2019 मध्ये एका तरूणाचा धारदार शस्राने गळा चिरून खून करण्यात आला होता. पोलिसांनी केलेला तपास व समोर आलेले पुरावे याआधारे ही शिक्षा सुनावली असुन हा खुन खटला त्यावेळी खुप गाजला होता. आरोपी खदीर शेख, निजाम केळगावे व उस्मान केळगावे यांना शिक्षा सुनावली आहे.

 सास्तूर येथील 23 वर्षीय दिलीप साहेबराव शिंदे या तरुणाचा 17 डिसेंबर 2019 रोजी खुन करण्यात आला होता. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे सांगण्यात येत होते. मयत शिंदे याचे गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. शिंदे हा क्रांती चौकातून जात असताना खदीर शेख याने उस्मान केळगावे व अन्य एकाच्या मदतीने शिंदे याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले व त्यानंतर गळा चिरून त्याचा खून केला होता. या खुन प्रकरणी लोहारा पोलिसांत तिघांविरूद्ध खूनाचा गुन्हा कलम 302 अंतर्गत दाखल करण्यात आला होता त्यानंतर आरोपी खदीर शेख, उस्मान केळगावे यांना अटक केली.  

  खुन प्रकरणात 10 साक्षीदार तपासण्यात आले त्यात डॉ सुनील मंडले, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विजय शिंदे, व्यंकट शिंदे व प्रशांत सुरवसे यांची साक्ष महत्वाची ठरली.तपास अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक विजय चौरे यांनी महत्वपूर्ण पुरावे व तपास केला.

 
Top