धाराशिव / प्रतिनिधी-

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम {CMEGP} अंतर्गत राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने जिल्ह्यातील तरुण-तरूणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी निर्माण करण्यात आली आहे.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 45 (अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक यांना 50 वर्ष ) तसेच शैक्षणिक पात्रता  प्रकल्प  10 ते 25 लाख रुपयांचा असेल तर त्यासाठी 7 वी पास आणि प्रकल्प 25 ते 50 लाख रुपयांचा असेल तर त्यासाठी 10 वी पास असणे आवश्यक आहे.

 उत्पादन उद्योग ( कमाल प्रकल्प मर्यादा ) 50 लाख रुपये, सेवा  उद्योग ( कमाल प्रकल्प मर्यादा ) 20 लाख रुपये आहे.

 प्रकल्प अहवाल  हा स्थिर भांडवल मशीनरी रक्कम कमीत कमी 50 टक्के,  इमारत बांधकाम जास्तीत जास्त  20 टक्के  आणि खेळते भांडवल जास्तीत जास्त  30 टक्के या विहित निकषांवर  अधारीत असणे आवश्यक आहे.   यामध्ये स्वगुंतवणूक  5 ते 10 टक्के असणे आवश्यक आहे. अनुदान मर्यादा  15 ते 35 टक्के पर्यंत आहे.   योजना ही नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे. वैयक्तिकरित्या पात्र कोणतीही व्यक्ती यासाठी अर्ज करुन शकते.

 ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे विहित  कागदपत्र पासपोर्ट साइज फोटो, आधार कार्ड, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा डोमिसीयल सर्टिफिकेट, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा जसे 10 वी ,12वी, पदवीचे गुणपत्रक ), हमीपत्र  (Undertaking Form ) वेबसाईटवर मेनू मध्ये मिळेल, प्रकल्प अहवाल, जातीचे प्रमाणपत्र ( अ जा /अ ज असेल तर ), विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र ( माजी सैनिक, अपंग ), REDP/EDP/SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र, लोकसंख्याचा दाखला (20000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर), पार्टनरशिप उद्योग असेल तर रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आणि अधिकार पत्र आदी कागदगपत्रांची आवश्यकता आहे.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ http://maha-cmegp.gov.in संकेत स्थळाला भेट दयावी  व आजच संकेतस्थळावर अर्ज दाखल करावेत,  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.


 
Top