धाराशिव / प्रतिनिधी-

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  असलेली दुरदृष्टी लोकाभिमुख निर्णय यामुळे ते भारतात एक नंबरचे नेतेतर आहेतच परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली भा.ज.पा.जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून नावारूपास येत आहे एवढेच नाही तर जगातील 150 देशांनी नरेंद्र मोदी यांना नेता माणले आहे हे भारतीयांच्या दृष्टीने गौरवास्पद असल्याचे प्रतीपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

 धाराशिव येथे 11 मे रोजु बूथ प्रमुख शक्तीकेद्र प्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बावनकुळे बोलत होते  यावेळी आ.राणाजगजितसिंह पाटील,माजी आमदार सुजितसिंह ठाकूर धाराशिव जिल्हा भाजपाचे अध्यक्ष नितीन काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 2019 मध्ये उध्दव ठाकरे यांनी दगा देऊन 25 वर्षापूर्वीच्या युतीस तडा दिला.त्याचा बदला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचे सांगून काश्मीरचे कलम  370 रद्दकरण्याचे धाडस मोदीजीने दाखवले.त्यामुळे खऱ्या अर्थाने काश्मीर आपला झाला. सुप्रीम कोर्टात महायुतीच्या बाजूने निकाल लागला .त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार संवैधानिक असल्याचे स्पष्ट झाले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका यात भारतीय जनता पार्टी जिल्ह्यात आज प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला आहे, आणि हे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच शक्य होऊ शकल्याचे आ.बावनकुळे म्हणाले..

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, मराठवाडा संयोजक धनंजय कुलकर्णी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ताभाऊ कुलकर्णी, अँड. मिलिंद पाटील, खंडेराव चौरे, सुधीर पाटील, संताजी चालुक्य, अनिल काळे, व्यंकट गुंड, अस्मिताताई कांबळे, सतिष दंडनाईक, मकरंद पाटील, युवराज नळे,  अँड.जहीर चौधरी, राजसिंह राजे निंबाळकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top