धाराशिव / प्रतिनिधी-

  पोलीस खात्यात निरंतर उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदारांस प्रतिवर्षी पोलीस महासंचालक पदक दिले जाते. सन- 2023 या वर्षातील पदक प्राप्तकर्त्यांची यादी नुकतीच जाहीर झाली. यात पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव येथे कार्यरत असलेले  सहा. पोलीस निरीक्षक  अमोल नवनाथ पवार, पोलीस अंमलदार- प्रदीप तानाजी वाघमारे नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा
धाराशिव यांचा समावेश आहे.

  अमोल नवनाथ पवार रा.धाराशिव हे  जिल्हा पोलीस दलात सहा. पोलीस निरीक्षक म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय, उस्मानाबाद येथे कार्यरत आहेत. पवार यांनी 62 व्या अखिल भारतीय कर्तव्य मेळावा लखनौ उत्तर प्रदेश येथे महाराष्‌टर राज्य पोलीस दलाच्या संघातुन प्रतिनिधित्व करुन “गुन्हे तपास, कायदे व प्रक्रिया” या विषयामध्ये सुवर्ण पदक पटकावले तसेच महाराष्टर राज्यास सर्वसाधारण विजेतेपद मिळून देण्यास मोलाची कामगिरी केली. तसेच पोलीस अंमलदार  प्रदीप तानाजी वाघमारे  स्थानिक गुन्हे शाखा उसृमानाबाद येथे कार्यरत असुन  वाघमारे यांनी उस्मानाबाद  जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे परजिल्हे कर्नाटक व तामिलनाडू  राज्यातील गुन्हेगारांची विस्तृत माहिती असुन दरोडा, जबरी चोरी व घरुोडी असे एकुण 65 पेक्षा जास्त मालाविषयी गुन्हे व खुनाचे 06 गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच 75 फरारी /पाहिजे असलेले आरोपी शस्त्रासह अटक करुन एकुण 17 लाख रुपये किंमतीचा गेला माल हस्तगत केला आहे. यांच्या पोलीस खात्यातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनी त्यांना मा.पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह पदक मा. पालक मंत्री  प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे हास्ते देण्यात आले.

  तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी-पोलीस निरीक्षक   यशवंत जाधव, सपोनि- मनोज निलंगेकर, पोउपनि-  संदीप ओहोळ यांना धाराशिव जिल्ह्यामध्ये श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव, श्री येडेश्वरी देवी चैत्री पोर्णिमा यात्रा व काळभैरवनाथ यात्रा काळामध्ये कर्तव्य अत्यंत शिस्तबध्द, जबाबदारीने व सतर्कतेने बजावून एकुण माला विषयीचे एकुण 82 गुन्हे उघडकीस आणुन 213 संशईत गुन्हेगारांना पकडून चांरी, जबरी चोरी, अशा गुन्ह्याना प्रतिबंध करुन अतिशय उल्लेखनिय  कामगिरी करुन जनसामान्यात पोलीसांची प्रतिमा उंचविण्यास अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. तर पोलीस हवालदार- महेश हरीभाऊ कचरे ने- जिल्हा विशेष शाखा उस्मानाबाद यांनी  उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध पक्ष/संघटनेकडून होणारे आंदोलने, तसेच सोशल मिडीया, राजकीय, समाजिक  हालचालीची गोपनीय माहिती हस्तगत करुन वेळीेवेळी वरिष्ठांना दिल्यामुळे घडणारे घटनेस वेळीच प्रतिबंद करता आले. यांच्या पोलीस खात्यातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना 1 मे 2023 रोजी  मा. पालक मंत्री   प्रा. डॉ.  तानाजीराव सावंत यांचे हस्ते प्रशस्ती पत्र देण्यात आले.

  सदर कार्यक्रमास   प्रा. डॉ.   तानाजीराव सावंत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र शासन तथा पालक मंत्री, धाराशिव जिल्हा,अध्यक्ष जिल्हा नियोजन समिती धाराशिव, मा. पोलीस अधीक्षक   अतुल कुलकर्णी,  जिल्हाधिकारी श्री. सचिन ओम्बासे,  अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत मा. अप्प्र पोलीस अधीक्षक  राहुल गुप्ता यांसह जिल्हा पोलीस दलातील अधिकारी- अंमलदार उपस्थ्तिीत होते.


 
Top