तेर / प्रतिनिधी-

 धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा हायस्कूल  येथे महाराष्ट्र दिनानिमीत्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेरणा चॅरिटेबल ट्रस्टचे  विश्वस्त अॅड. बाळासाहेब वाघ हे होते.  प्रमुख पाहुणे म्हणून तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड, पत्रकार नरहरी बडवे  ,तेरच्या पोलीस पाटील फातिमा मनियार  उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक  संतोष गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. .याप्रसंगी नंदकुमार खोत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी गुणवंत विद्यार्थी दहावी परीक्षा मार्च 2022 प्रथमेश भक्ते प्रथम , दीप्ती इंगळे द्वितीय, त्रिशा गाल्टे तृतीय ,बारावी परीक्षा फेब्रुवारी 2022 बोबडे संस्कृती प्रथम, सरवदे रागिनी द्वितीय ,आरती तुपेकर तृतीय यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रशालेतील अच्युत हाजगुडे, सूर्यकांत जाधव, बिभीषण देटे,  रमेश लकापते , संजीवनी भोसले, सुवर्णा घुटे, शरद सोनवणे, प्रदीप कोकाटे ,दयानंद फंड, आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ पांचाळ यांनी केले . यावेळी मज्जित मनियार, नवनाथ पसारे व पालक उपस्थित होते.


 
Top