धाराशिव / प्रतिनिधी-

जिल्ह्यातील नागरिकांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण  मंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचे जिल्हा संपर्क कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरू करण्यात आले असून, या संपर्क कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

 या उद्घाटन प्रसंगी , जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजभाऊ गलांडे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, आदी मान्यवर उपस्थित होते.

 जिल्ह्यातील विकास कामे तसेच सर्वसामान्य नागरिकांची प्रलंबित असलेली कामे तात्काळ मार्गी  लावण्यासाठी  पालकमंत्री यांचे उस्मानाबाद येथे जिल्हा संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे.


 
Top