वर्ष लोटले तरी मिळेना पिक विमा; शेतकरी हाताश 

  धाराशिव / प्रतिनिधी-

वर्ष लोटले तरी नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा  िमळाला नाही, नुकसान भरपाई मिळाली नाही या चितेंत असलेल्या शेतकऱ्यांना  आता  महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून पिक कर्ज देण्यास ही टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक द्ष्टया खुचन गेला आहे. सध्या लगीन सराईचे दिवस चालू आहेत. वयात आलेल्या पाल्यांचे विवाह कसा करायाचा हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. याकडे गांभीर्याने बघत  शेतकऱ्याला पिक विमा, पीक कर्ज, नुकसान भरपाई त्वरीत देण्याची मागणी वैतागलेल्या शेतकऱ्यांने  जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे  केली आहे. 

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,  टाकळी, बेंबळी गट क्रमांक 512 ही जमीन माझ्या मालकीची असून सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असून आता  पुढील पिके घेण्यासाठी तात्काळ पीक कर्ज मिळणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु महाराष्ट्र ग्रामीण बँक , बेंबळी या बँकेकडून   सहकार्य मिळत नाही. तेथील बँक मॅनेजर व कर्मचारी सहकार्य करत नसून टोलवाटोलचे उत्तरे व मदत करण्यास टाळत आहेत. त्यामुळे शेतकरी कुंभार यांच्यावर आसमानी व सुलतानी संकट कोसळलेले आहे.  शेतावरीच पुर्ण  कुटुंब अवलंबून आहे. त्यामुळे तात्काळ कमीत कमी पीक कर्ज देऊन सहकार्य करावे नाहीतर  कुटुंबावर सामूहिक आत्महत्या किंवा आत्मदहन केल्याशिवाय प्रश्न मिटत नाही का? असे वाटत आहे.                                        

 सध्य परिस्थितीत शासन व प्रशासन तुपाशी व नुकसानग्रस्त शेतकरी उपाशी अशी दयनीय   व  वैफल्यग्रस्त झालेल्या स्थिती  आहे. अशा परिस्थीमधुन  शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री संबंधित प्रशासनाला व बँकेला आदेश करून न्याय देण्याची मागणी केली आहे. निवेदनावर    नुकसानग्रस्त शेतकरी, सतीश शहाजी कुंभार यांची स्वाक्षरी आहे. 


 
Top