धाराशिव / प्रतिनिधी-

तालुक्यातील कौडगाव (बावी) येथील नायब सुभेदार दयानंद बाबुराव कदम हे 24 वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झाले. ते इंडियन आर्मीत मराठा बटालियन मध्ये कार्यरत होते. त्यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा व कौडगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार गुरुवारी दि.11 मे रोजी करण्यात आला.           

 खेड ता. धाराशिव येथील लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयाचे संस्थापक लिंबराज टिकले गुरुजी अध्यक्षस्थानी होते. सरपंच पवन ढेकणे, मंत्रालय कक्ष अधिकारी संतोष नाईकनवरे, भारतीय सेवेतील कनिष्ठ अधिकारी अंकुश मेटे, सीमा सुरक्षा बलचे निवृत्त अधिकारी अशोकराव उंबरे, बब्रुवान जाधव, माजी सरपंच सुनिल ढेकणे, ग्रामसेविका मीरा शेळके, रवींद्र कदम, सुरज कदम, शिक्षक नागेश कदम, सीताराम कदम, नानासाहेब सावतर, गणपतराव कदम, दत्तात्रय ढेकणे, साईनाथ रुद्रके आदी उपस्थित होते. कौडगाव येथील बाबुराव कदम यांना तीन मुले असून दयानंद कदम व शरद कदम हे इंडियन आर्मी मध्ये कार्यरत आहेत. शाम कदम शेती करतात. नायब सुभेदार पदावरून 24 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल दयानंद कदम यांचा कौडगाव ग्रामस्थ यांनी नागरी सत्कार केला. यावेळी मित्रमंडळी, नातेवाईक, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top